दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चौघांसह १० दुचाकी हस्तगत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । अमळनेर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करत चार ‎संशयितांना अटक केली असून,‎ त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त‎ केल्या आहेत.‎ गजानन दिलीप ताकतोडे (रा.‎ गांधलीपुरा, अमळनेर), विक्की‎ जवाहरलाल सोनवणे (रा.‎ सानेनगर, तांबेपुरा), संभाजी बाळू‎ पाटील (रा सातरणे) यांची नावे‎ समोर आली.

याबाबत असे की, रामनगर भागातील रहिवासी‎ दिनेश चौधरी यांची सुजाण मंगल कार्यालयाजवळील पार्किंगमधून एचएफ‎ डीलक्स दुचाकी (क्र.एम.एच.१८-ए.डी.४ ७१५) १३ ‎रोजी रात्री चोरट्याने लंपास केली‎ होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक ‎फौजदार रामकृष्ण कुमावत करत‎ होते. तांबेपुरा भागातील भूषण‎ पाटील हा त्याच्या साथीदारांसह‎ दुचाकी चोरत असल्याची माहिती‎ पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार‎ तपास पथकातील सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत, सहाय्यक‎ फौजदार बापू साळुंखे, सुनील‎ हाटकर, मिलिंद भामरे, दीपक माळी‎ यांनी संशयित भूषणला ताब्यात‎ घेऊन चौकशी केली. याप्रकरणी चौघांना ताब्यात‎ घेऊन १० दुचाकी जप्त केल्या.‎ ‎

जप्त केलेल्या दुचाकी अशा…
हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स (क्र.एम.एच.१८-ए.व्ही .४७१५),‎ बजाज डिस्कव्हर, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, पॅशन एक्सप्रो, हिरो होंडा सी.बी.झेड., एच.एफ.डिलक्स काळ्या‎ रंगाची, दोन होंडा शाईन काळ्या रंगाच्या, हिरो कंपनीचे इंजीन असलेली अशा १० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.‎ एकूण २ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -