fbpx

बांडुक गॅंगचा म्होरक्या जाळ्यात : तीन दुचाकी हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१  शहरात फिरून दुचाकी चोरी करणारी गॅंग स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून बांडुक गॅंगचा म्होरक्या शुभम शिवराम मिस्त्ररी यास त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. एलसीबीच्या पथकाने त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकींची चोरी बांडुक गँगचा प्रमुख शुभम मिस्तरी हा करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कलावसंत नगर येथे रेल्वेगेट कडे जाणाऱ्या रोडवर संशयित आरोपी शुभम मिस्तरी आणि राहुल रविंद्र कोळी (वय-१९) रा. मेस्कोमाता नगर यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्या ताब्यातील दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केली आहे. तर तिसरी दुचाकी शुभमच्या राहत्या घरातून हस्तगत केली आहे. तीनही दुचाकी ह्या शनीपेठ हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अश्रु शेख, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, वसंत लिंगायत, उमेशगिरी गोसावी यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज