चक्क ट्रायलच्या बहाण्यानेच लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । भास्कर मार्केट परिसरात जुनी दुचाकी विकत घ्यायची आहे. ट्रायल घेतो असे म्हणत विक्रेत्याकडून दुचाकी घेत एका तरुणाने धूम ठोकल्याचा प्रकार बुधवारी रोजी उघडकीस आला आहे. दोन दिवस शोध घेऊनही त्याची काहीच माहिती न मिळाल्याने या व्यक्तीविरुध्द अजय मच्छींद्र चौधरी (वय ३१) यांच्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय मच्छींद्र चौधरी (३१, रा. झुरखेडा, ता.धरणगाव) या तरुणाचा जुनी दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या समोरच भास्कर मार्केटमध्ये १४ क्रमांकाच्या गाळ्यात स्वराज ऑटो कन्सलटींग नावाने दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजता एका रिक्षातून दोन तरुण आले. त्यापैकी ३५ वर्षीय तरुणाने मला जुनी दुचाकी घ्यायची आहे असे सांगितले असता चौधरी यांनी वेगवेगळ्या दुचाकी दाखविल्या, त्यापैकी ( एम.एच.१९ डी.एल.७४४४ ) क्रमांकाची दुचाकी त्याने ट्रायलसाठी मागितली.

चौधरी यांनी त्यास चावी दिली. दोघं तरुण बहिणाबाई उद्यानाकडे दुचाकी घेऊन गेले ते परत आलेच नाहीत. बराच वेळ झाल्याने चौधरी यांनी त्याचा शोध घेतला मात्र, काहीच माहिती मिळाली नाही. परत आल्यावर रिक्षाचालकही गायब झालेला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बुधवारी सायंकात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज