fbpx

जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जळगाव शहरात सुरु असलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीय. चोरीचे सत्र सुरूच असून जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मुख्य गेटसमोरून २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अनिल श्रीराम महाजन (वय-५२ रा. न्यू इंदीरा नगर, बऱ्हाणपुर मध्यप्रदेश)  हे शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी ४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता दुचाकी (एमपी ६८ एमए ८२८) ने आले. त्यावेळी त्यांनी त्यांची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी रूग्णालयाच्या गेट समोर पार्कींगला लावून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. दुपारी १२.३० भेटून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही.

mi advt

त्यांनी परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळाली नाही. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईका प्रविण भोसले करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज