दुचाकी चोरी थांबेना, शहरातून दोन दुचाकी लंपास

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट । शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबतच नसून गोलाणी मार्केट व नवीन बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळ्यातील मयूर कॉलनी येथील रहिवासी रामकृष्ण नारायण महाजन हे दि.२३ रोजी सकाळी नवीन बसस्थानकावर दुचाकीने आले होते. आवारात दुचाकी उभी करून ते कामानिमित्त निघून गेले. रात्री ११ वाजता दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी परतल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे आढळून आले. याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वंजारी बुद्रुक येथील राहुल सोनवणे यांनी गोलाणी मार्केट आवारातील दत्तमंदिराजवळ उभी केलेली दुचाकीसुद्धा चोरून नेली. दोन्ही चोरी प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar