fbpx

जळगावात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबेना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नाहीय. शहरातील विविध पोलीस स्थानकात चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काल शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील पार्किंगमधून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय भरत निकम (वय-२१) रा. प्रिया ट्रेडिंग कंपनी, जुना मेहरूण रोड जळगाव हा तरूण २ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकी (एमएच १९ बीके ३९१५) ने शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला. त्यावेळी दुचाकी तळमजल्यावरील गायत्री फुल भंडार येथे पार्किंगला लावली. १२.१५ वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही.

परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही दुचाकी आढळली नाही. धनंजय निकम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज