fbpx

जळगावात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ; लॉड्री व्यवसायिकाची दुचाकी लांबविली

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । जळगाव शहरात सुरु असलेले दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबण्याचे नाव घेत नाहीय. दुचाकी चोरींच्या या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शहरातील राम मंदीराजवळून लॉड्री व्यवसायिकाची दुचाकी लांबविल्याची घटना घडलीय. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की,  गोपाल मोतीराम महाले (वय-४६) रा. राम मंदीराजवळ अयोध्यानगर जळगाव यांचे हे कपडे इस्त्री करण्याचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ मे रोजी त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बीझेड ४९३९) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती.

रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २३ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही. गोपाल महाले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज