fbpx

दुचाकी चोरीच्या घटना थांबेना ; जळगावातून पुन्हा तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव रेल्वे स्टेशन समोर पार्किंगला लावलेली तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, दिनेश अशोक जैसवाल (वय-३१) रा. अशोक नगर अयोध्या नगर हे कामाच्या निमित्ताने शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी जळगाव रेल्वे स्थानकासमोर लावून कामानिमित्त निघून गेले. काम आटोपून रात्री ११ वाजता दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. परिसरात शोध करून दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिनेश जैसवाल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.

mi advt

दरम्यान, मागील गेल्या काही महिन्यापासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज