अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना वेले ते मजरे-होळ नजीक रात्री घडलीय. सुबण्या बारेला (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे.  

याबाबत असे की, मध्य प्रदेशातील निरगुड्या येथील सुबण्या बारेला (वय ३२) हा त्यांची पत्नी निर्मला बारेला (वय २६) व मुलगी भारती बारेला(वय १३) यांच्यासह चोपडयाहून धरणगावकडे हिरोहोंडा पॅशन दुचाकी (एमपी – ६९०५)ने जात असताना वेले ते मजरे-होळ दरम्यान चोपड्याकडे जाणार्‍या एका अज्ञात चारचाकीने समोरुन दुचाकी जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार सुबण्या बारेला हे जागीच ठार झाले. तर निर्मला बारेला व भारती बारेला यांना गंभीर दुखापत झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज