fbpx

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चाळीसगाव नजीक घटना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी चाळीसागव नजीक हरभोले  हॉटेल समोर घडली. चरणदास गणपत चव्हाण (वय- ४८ रा. तळोंदा ता. चाळीसगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत असे की, चरणदास चव्हाण हे बि- बियाणे घेण्यासाठी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीवर (क्र. एम.एच. १९ एफ- ३१३३) चाळीसगावाकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग २११ वरील हरभोले हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. घटनास्थळावरून वाहनधारक हा पसार झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच लागलीच पीएसआय भागवत पाटील, पोहेकॉ शामकांत सोनवणे, पोलिस नाईक सोनार, गणेश पवार, नितीन अघोने व चालक काळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पीएसआय भागवत पाटील यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलावून प्रेताला ग्रामीण रूग्णालयाकडे रवाना केले आहेत. मयत चरणदास यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt