जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढताय?, टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे, अशातच नांदगाव रोडवर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अंबादास धर्मा पानसरे (वय ३२) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील शिंदी येथील अंबादास धर्मा पानसरे यांच्या चाळीसगाव तालुक्यातील नांदगाव रोडवरील तळेगावनजीक खंडेराव माथ्याजवळ भरधाव टँकर (एमएच- २८, एबी- ७३२१)ने दुचाकी (एमएच- १९, बीटी- ७९२३)ला जबर धडक दिली. या अपघातात तालुक्यातील शिंदी येथील अंबादास धर्मा पानसरे (वय ३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.४० वाजेच्या घडली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, टँकरचालक गणेश सूर्यभान सोनूने (रा. सोयगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -