चाळीसगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील पातोंडा ओझर रोडवर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २४ रोजी रात्री घडली. ऋषीकेश दत्तात्रेय (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी येथील पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील पातोंडा, ओझर रोडवर एका अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत औरंगाबाद येथील ऋषीकेश चंद्रकांत दत्तात्रेय (वय-३७) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री ८:३० वाजेताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटना घडताच अज्ञात वाहन चालकांनी वाहनांसह पसार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -