दुचाकी ट्रॅक्टरला धकडली ; दुचाकीस्वार शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । रस्त्यावरुन जात असलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागुन येणारी दुचाकी ट्रॅक्टरला धकडली. यात दुचाकीस्वार संजय रामचंद्र सोनवणे (वय ४९, रा. कानसवाडा, ता. जळगाव) या शेतकऱ्याचा जागीच  मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कानसवाडा येथे रविवारी रात्री घडली.

याबाबत असे की, संजय सोनवणे हे दुचाकीने घरी जात होते. त्याचवेळी कानसवाडा शिवारात रस्त्यावरुन एक ट्रॅक्टर जात होते. या ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रक्टर जागीच थांबले. त्यावेळी ट्रक्टरच्या मागे भरधाव वेगाने येणारी दुचाकीवर संजय सोनवणे हे येत असतांना दुचाकी ट्रक्टरवर धडकली.

या अपघातात सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रात्री ८.३० वाजता सोनवणे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. घटनेनंतर ट्रॅक्टरचालकाने पळ काढला आणि ट्रॅक्टर रिकामे करुन पुन्हा घटनास्थळी आणुन उभे केले. ट्रॅक्टरचालकाच्या चुकीमुळे सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटंुबीय, नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकाच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मृत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -