fbpx

बांभोरी नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । महामार्ग क्रमांक 6 वरील पोतदार इंटरनॅशनल स्कूल बांभोरी जवळ आज दुपारी दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. पण वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

याबाबत असे की, बांभोरीजवळील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळ पाळधी कडून जळगाव शहर व जळगाव शहराकडून पाळधीकडे जाणाऱ्या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज