fbpx

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन युवक ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । दोन मोटारसायकलींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी यावल तालुक्यातील अकलूद गावानजीक असणार्‍या दुसखेडा फाट्याजवळ घडली. राजकुमार दिलीप तायडे आणि राहूल अरूण वारूळकर (रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) असे या अपघातातील मृत युवकांची नावे आहेत.

याबाबत असे की, दुसखेडा फाटा येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकली एकमेकांना धडकल्या. यात एमएच १९ पीडी- ७५५८ आणि एमएच १९ डीबी-५१६० क्रमांकांच्या गाड्यांवरील दोन्ही स्वार जबर जखमी झाली. यात पाडळसे (ता. यावल) येथील राजकुमार दिलीप तायडे आणि राहूल अरूण वारूळकर (रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) यांचा समावेश होता. यात राजकुमार तायडे याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर राहूल वारूळकर याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असतांना त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्थानकाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहचले. पुढील तपास पीएसआय एम.जे. शेख आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज