fbpx

प्रशिक्षणार्थींकडून पैशांची वसुली ; एसटीच्या जळगाव विभागातील दोघे तडकाफडकी निलंबित

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्यासाठी जळगाव विभागातील एसटीच्या १५० प्रशिक्षणार्थींकडून प्रत्येकी १५०० रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहायक वाहतूक निरीक्षकासह दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे. मुंबईच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून निलंबित केल्याचे पत्र २४ ऑगस्टलाच मिळाले आहे.

काय आहे प्रकार?
राज्य परिवहन मंडळातर्फे दोन वर्षांपूर्वी ३ हजार ११६ चालक-वाहक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर जळगाव विभागातील १७३ चालक-वाहकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सहायक वाहतूक निरीक्षक सतीश सातपुते यांनी ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्यासाठी यातील १५० प्रक्षिणार्थींकडून वरूनएसटीच्या १५० प्रशिक्षणार्थींकडून प्रत्येकी १५०० रुपये घेणे भोवले. प्रत्येकी १५०० रुपयांची मागणी केली होती. तर सर्वकाही माहित असूनही लाइन चेकिंगचे वाहतूक निरीक्षक बाबू तडवी यांच्यावर माहिती दडवण्याचा ठपका ठेवला आहे.

१५० प्रशिक्षणार्थींचीही तक्रार :

ज्या १५० प्रशिक्षणार्थींकडून प्रत्येकी दीड हजार रुपये मागितले होते. त्यांनीदेखील याबाबत लेखी तक्रारीही केल्या होत्या. या १५० प्रशिक्षणार्थींकडून एकूण सव्वादोन लाख रुपयांची रक्कम जमा केली होती. याबाबत अनेक दिवसांपासून मुख्य सुरक्षा अधिकारी (मुंबई) तपास करत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज