पशुधनाचा ट्रक प्रकरणात आणखी दोन कर्मचारी रडारवर!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथे पशुधनाचा ट्रक पकडल्यानंतर उशिराने चालान दिल्याचे आणखी एक प्रकरण पहूर पोलीस ठाण्यात उघडकीस आले आहे. हा प्रकार ४ रोजी झाला. या प्रकरणी याच पोलीस ठाण्याचे आणखी दोन पोलीस रडारवर असल्याची माहिती समोर आहे. त्यांचीही चाळीसगाव येथे चौकशी होणार आहे.

दि.४ डिसेंबर रोजी म्हशींचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला पण कारवाई न करता तो सोडून देण्यात आला. याबाबत स्वतः ट्रक सोडण्याची एन्ट्री पोलीस निरीक्षक धनवडेंनी घेतली आहे. म्हशींचा ट्रक ताब्यात घेतल्यानंतर जागेवर चालान फाडणे आवश्यक असताना चालान चार ते पाच तास उशिरा फाइल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. त्यावरुन आता चौकशी होणार असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर १५ दिवसात पहूर पोलीस स्टेशन गुरांच्या तस्करीने दोन लाखांच्या गैरव्यवहाराने पोलीसांचे वाभाडे निघाले आहे. धनवडे शुक्रवार, शनिवारी व रविवार असे दिवस सुटीवर होते. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी जामनेर तालुक्यातील एका गावात पंटरची रात्री भेट घेतली. प्रकरण मागे घेण्यासाठी संबंधित रेकॉर्डिंगमधील हिंदी भाषिक व्यक्तीला पैसे परत द्यावेत आणि हे प्रकरण थांबविण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नावे यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित दुकानेदाराने दिलेला जवाब फिरविण्याकरीता दुकानदाराला गळ घातल्याची माहिती चर्चेतून पुढे येत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -