चाळीसगावजवळ भीषण अपघात, दोघे ठार, एक गंभीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून अनेकांचे बळी जात आहेत. चाळीसगाव तालुक्यातील जवळ सोमवारी सायंकाळी बोलेरो व दुचाकीची धडक झाल्याने दोघे जागीच ठार झाले तर एक गंभीर आहे.

चाळीसगाव शहरालगत असलेल्या बिलाखेडजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बोलेरो क्रमांक एमएच.०४.सीएम.५३९४ व दुचाकी बुलेटची समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील प्रकाश एकनाथ बाविस्कर (वय-२४) व विजय दगडू मोरे (वय-२५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य श्रावण शहादेव रा.आडगाव हा गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडताच बोलेरोवरील चालक हा पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघात इतका भयंकर आहे की बुलेट चक्काचूर झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -