एरंडोलजवळ भीषण अपघात, दोघे ठार, चौघे जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । एरंडोलजवळ मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जळगाव येथील दुध विकास केंद्राचा ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, अपघातात चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जळगावला हलविण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावरील दत्त मंदिराजवळ हा अपघात झाला. यात कारमधील दोन जण जागीच ठार झाले व चार जण जखमी झाले. ट्रक जळगावहून धुळ्याकडे जात होता. तर कार क्रमांक एम. एच. १९ सी.व्ही. ९२५७ ही पारोळ्याकडून एरंडोलकडे येत होती. ही गाडी वावडदे ता. जळगाव येथील असल्याचे समजते.

रात्री उशिरापर्यंत जखमींना जळगावला हलविण्यात आले. अपघातील एक मयत हा बिलवाडी येथील तर दुसरा जळगावातील असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या नावाची रात्री उशीरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -