fbpx

पिंपळगांव खुर्द येथे विजेच्या तुटलेल्या तारांमुळे दोन बकऱ्या दगावल्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव खुर्द॥ येथे 20 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या होत्या. यादरम्यान, येथील शेतमजुर बकऱ्या चारावयास गेला असता तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे दोन बकऱ्या ठार झाल्या. सुदैवाने त्यांचा मुलगा बालंबाल बचावला आहे.       

पिंपळगाव खुर्द येथील रमेश शिंदे यांचा मुलगा दि. 21 मार्चच्या सकाळी नेहमीप्रमाणे गावाजवळील शाम पाटील यांच्या गव्हाची काढणी होऊन रिकाम्या झालेल्या शेतामध्ये बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी शेतात रात्रीच्या वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन दोन मोठया बकऱ्या क्षणात जागेवरच गतप्राण झाल्या. त्यामुळे रमेश शिंदे या गरिब शेतमजुराचे फार मोठे नुकसान झाले आहे. विज वितरण कंपनीच्या सेवकांनी तेथे जाऊन पंचनामा केल्याचे समजत आहे.  शिंदे यांना योग्य भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज