दीक्षितवाडीतील दोघांना रेल्वे स्टेशनजवळ मारहाण, एकाची करंगळी मोडली

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । शहरातील दीक्षितवाडीत राहणारे चौघे तरुण चित्रपट पाहून रेल्वेस्टेशन परिसरात उभे असताना दोन तरुणांनी दोघांना बेदम मारहाण केली. मारहाणीत एकाची करंगळी मोडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सुहास चौधरी (वय २५ ,) याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कल्पेश भोईटे व प्रशांत उर्फ गोलू भोईटे यांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर असे की,  दि.१६ रोजी तो मित्र वैभव सुभाष काळे, घनश्याम भरत काळे, सौरभ अनिल पाटील असे आयनॉक्स पिक्चर टॉकीज येथे सुर्यवंशी चित्रपट पाहणेसाठी रात्री १०.३० वाजता गेले होते. चित्रपट सुटलेनंतर चौघे रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साधारण रात्री १.३० वाजता आले होते.

रेल्वेस्टेशनजवळ उभे असलेले कल्पेश भोईटे, प्रशांत उर्फ गोलु भोईटे (पुर्ण नांव व पत्ता माहीती नाही) हे यश जवळ आले व म्हणाले की, ये तु इकडे ये असे म्हणुन त्याला थोडे बाजुला नेले व त्याच्या गळ्यात हात टाकुन विचारले की, तु कोठे राहतो. तेव्हा यशने त्यांना सांगीतले की, मी दिक्षीतवाडीत राहतो. तेव्हा त्यांनी त्याच्या गळयावर, छातीवर, डोक्यावर, पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यावेळी वैभव काळे मला हा वाद सोडविणेसाठी आला असता, त्यातील एकाचे हातात काहीतरी लोखडी वस्तु होती. त्याने ती वस्तू वैभव याचे डावे हाताचे करंगळीवर मारल्याने त्याचे बोटाचे हाडाचे तुकडा होउन त्यास दुखापत झालेली आहे. या मारहाणीत यशच्या खिशातील असलेले ४ हजार रुपये देखील त्याच ठिकाणी पडुन गहाळ झाले आहे. त्यानंतर दोघे तेथुन पळुन गेले.

बुधवारी याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी रात्री उशिरा कल्पेश भोईटे आणि प्रशांत भोईटे यांना अटक केली आहे. तपास ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज