महामार्गावर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । शहरातील आकाशवाणी चौकात शनिवारी सकाळी ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहे.

सावद्याहून आलेला ट्रक क्रमांक एम.एच.१५.सीके.५२५२ क्रमांकाचा हा ट्रक सिमेंट भरण्यासाठी पिंप्राळा भागातील रेल्वे माल धक्क्याकडे जात होता. आकाशवाणी चौकात या ट्रकने दुचाकी क्रमांक एमएच.१९.के.२४१३ ला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. हे जखमी झालेले दोन्ही जण अल्पवयीन मुले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या मुलांना भास्कर मार्केट परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, या जखमी मुलांच्या उपचाराचा खर्च ट्रक चालक मोतीसिंग अर्जुनसिंग परदेशी ( वय ५५ , रा।सावद , ता – रावेर ) यांनी देण्याची तयारी दाखवल्याने आणि कुणीच कुणाच्या विरोधात पोलिसांना फिर्याद न दिल्याने व आपसात समझौता झाल्याने पोलिसांकडे या अपघाताची नोंद झाली नसल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -