fbpx

पोहण्याचा मोह बेतला जिवावर ; यावलमधील दोन मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडलीय. दिपक जगदीश शिंपी (वय १२ वर्षे) व गणेश बापु दुसाने (वय१४ वर्ष) असे मृत दोघांची नावे आहे.

याबाबत असे की, यावल शहरातील या सुर्दशन चित्र मंदीर परिसरात सरस्वती विद्यामंदीर या शाळाजवळ राहणारे दिपक व गणेश ही मुले काल आपल्या मित्रांसह यावल-भुसावळ मार्गावरील असलेल्या पाटचारीत पोहण्यासाठी गेले होते.  त्यातील एक मुलगा हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो वाहुन जात असल्याचे पाहुन त्यास वाचविण्यासाठी गणेश बापु दुसाने याने एकास काठीच्या सहाय्याने वाचविले. मात्र तो वाहून गेला. त्याच्या सोबत गणेश बापू दुसाने हा देखील वाहून गेला. त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरड केली पण त्यांना मदत मिळु शकली नाही. काल दुपारपासून या दोन्ही मुलांचा शोध घेतला जात होता.

mi advt

दरम्यान, आज सकाळी यातील दीपक जगदीश शिंपी या मुलाचा मृतदेह आढळून आला असून गणेश बापू दुसानेचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सुदर्शन चित्रमंदिर परिसरावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज