fbpx

घरफोडी करणाऱ्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । जळगावातील एकनाथ नगरात घरफोडी करणाऱ्या तिघांपैकी दोन भामट्यांच्या एमआयडीसी पोलीसांनी काल रात्री मुसक्या आवळल्या आहेत. विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२०) व विशाल किशोर मराठे (वय-२०), असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत असे की, शहरातील  रामेश्वर कॉलनीमधील एकनाथ नगरात राहणारे सिताराम देला राठोड (वय-४२) यांच्या घरात ५ मे रोजी चोरी झाली होती. त्यात ६५ हजाराचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी सिताराम राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असतांना विशाल दाभाडे आणि विशाल मराठे, आकाश उर्फ आप्या सुनिल नागपुरे तिघे रा. रामेश्वर कॉलनी अशी तीन नावे निष्पन्न झालीत.

त्यापैकी काल शुक्रवारी रात्री दोघांना एमआयडीसी पोलीसांनी राहत्या घरातून अटक केली. त्यांनी चोरी केलेल्या ६५ हजार रूपयांपैकी २३ हजार रूपये काढून दिले व गुन्ह्याची कबुली दिली. यातील तिसरा संशयित आरोपी आकाश नागपूरे हा फरार आहे. दोघांना आज शनिवार ३१ जुलै रोजी दुपारी जिल्हा सत्र व न्यायालयात हजर केले असता न्या. ए एस शेख यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज