fbpx

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात भुसावळातील दोघा भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री राष्ट्रीय महामार्ग ६ वर घडली आहे.  मनीष दरडा (३०) आणि रितेश दरडा (२६) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा भावडांची नावे आहेत.

याबाबत असे की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथील जुन्या प्रायमरी स्कूलजवळील रहिवासी मनीष दरडा आणि रितेश दरडा हे जळगाव येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा व्यवसाय करतात. काम आटोपून दुचाकीने घरी भुसावळला येत असताना ट्रॅक्टर शोरूमजवळ डंपर (जी.जे.१२ वाय ८१०६) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघा भावडांचा मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त समजताच सिंधी कॉलनीमधील सिंधी बांधवांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मनीष आणि रीतेश हे दोन्ही बंधू जळगाव येथे व्यवसाय करतात. तेथून ते भुसावळ येथे येत असतांना हा अपघात घडला. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्याने धाव घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज