fbpx

दुर्दैवी : बाप्पाला निरोप देण्याच्या दिवशी सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी समोर आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अनंत चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे नदीवर विसर्जन सुरू होते. दरम्यान, याच वेळी तितूर नदीत कमळेश्वर के.टी. वेअरजवळ साहिल शरीफ शहा (वय-१०) व आयान शरीफ शहा (वय-१४) दोघेही रा.वाघळी हे पोहायला गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते वाहू लागले. बाहेर पडता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान यातील एका मुलाचा मृतदेह तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर मिळून आला आहे. तर एकाचा शोध अद्याप सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज