fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

सम्राट कॉलनीजवळ दोन तरुणांचा वाद, दगडफेकीने तणाव

सम्राट कॉलनीजवळ दोन तरुणांचा वाद, दगडफेकीने तणाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । शहरातील सम्राट कॉलनीजवळ असलेल्या हुडकोच्या जुन्या पडीत इमारतीवर बसलेल्या दोन तरुणांमध्ये गुरुवारी रात्री वाद झाला. वादात त्यांनी इतरत्र दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सम्राट कॉलनी परिसराजवळ असलेल्या डायमंड हॉल समोर जुन्या घरकुल पडीत इमारती आहेत. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास काही तरुण त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगड भिरकवायला सुरवात केली. काही दगड रस्त्यावर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आणि वाद घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. बुधवारी रात्री देखील त्या दोन्ही तरुणांमध्ये वाद झाल्याचे समजते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज