fbpx

चोरट्यांचा उछाद ; खेडीमधून दोन दुचाक्या लांबविल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून खेडी मधील इंदीरा नगर व पिपल्स बँकेसमोर या दोन ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याची उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की,  पहिल्या घटनेत प्रविण शालीक कोळी (वय-४२) रा. इंदीरा नगर खेडी. ता.जि.जळगाव यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १९ सीडी ८३५४) पार्किंगला ९ मे रोजी रात्री १०.३० वाजता लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याचे १० मे रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आले. तर दुसऱ्या घटनेत  पवन रमेश कोळी (वय-३०) रा. कुसुंबा साईराम चौक हे बँकेच्या कामानिमित्त सोमवारी १० मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जळगाव औरंगाबाद रोडवील जळगाव पिपल्स बँकेत दुचाकी (एमएच १९ बीए ७०३८) ने आले. बँकेच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी दुचाकी पार्किंगला लावली.

१५ मिनीटात बँकेचे काम आटोपून पवन कोळी घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले. त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. दोन्ही घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील आणि पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज