बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । ग्राहकाने कर्जफेडीपोटी दिलेला धनादेश संबंधितांनी वटवला नाही. यामुळे ग्राहकाने जिल्हा ग्राहक आयोगात दावा केला होता. या दाव्यात तथ्य आढळल्याने शहरातील पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँकेला १० हजार रुपये दंड व अर्जाचा खर्च म्हणून ५ हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.

शहरातील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक राजेंद्रसिंग मंचसिंग बुडवाल यांनी नयन अनिल अग्रवाल यांनी घेतलेल्या कर्जापोटी ८ लाखांचा धनादेश ३० मार्च २०२० या दिवसाची तारीख टाकून दिला होता. राजेंद्रसिंग यांनी आपल्या आयसीआयसीआय बँकेत हा धनादेश २६ जून २०२० या रोजी वटवण्यासाठी टाकला. नंतर बँकेने २ जुलै २० रोजी हा धनादेश मुदतीबाहेरचा असल्याचे कारण नमूद करत त्याचा अनादर (बाऊन्स) केल्याने राजेंद्रसिंग यांना रक्कम मिळू शकली नाही.

राजेंद्रसिंग यांनी या संदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे दोन्ही बँकांविरोधात तक्रार दाखल केली होती. १० जानेवारी २२ रोजी आयोगाने दोन्ही बँकांना दहा हजार रुपये दंड व पाच हजार रुपये अर्जापोटी भरपाई देण्याचे आदेश दिले. ठेवीदारातर्फे अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय व अ‍ॅड.संजय तेलगोटे यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा:

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज