गावठी पिस्तुलासह भुसावळात दोघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांवर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. भुसावळ शहरातील ईदगाह रोडवरील हिरा हॉल जवळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ईदगाह रोडवरील हिरा हॉल जवळ शेख ताहेर शेख आजाद आणि शेख रिजवान शेख इलियास (दोन्ही रा. मुस्लिम कॉलनी) यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीच्या पिस्तूल, १५ हजार रुपये किमतीचे मोबाईल व ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज