fbpx

गावठी कट्टा, तीन जीवंत काडतुस, धारदार चाकूसह दोघे जाळ्यात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । फैजपूर-यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर वाद घालत असलेल्या २ तरुणांना फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, ३ जीवंत काडतुससह धारदार चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल तृभावी समोर दोन तरुणांमध्ये वाद सुरू असतांना अचानक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. वाद वाढल्याने एकाने दुसऱ्यावर गावठी कट्टा उगारला. या प्रकाराची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांनी उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व न्हावी बीटचे पो.हे.कॉ.राजेश बर्हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही तरुणांना वाद सुरू असताना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी विशाल गणेश सपकाळे, वय २९ रा.आमोदा व दिपक शांताराम सपकाळे, वय २६ रा.आमोदा या दोघांना एक गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे व धारदार चाकू सह ताब्यात घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज