fbpx

एमआयडीसी पोलीसांनी आवळल्या दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । जळगाव शहरासह जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांच्या एमआयडीसी पोलीसांनी आज मंगळवारी दुपारी मुसक्या आवळल्या आहे. यावेळी दोघांकडून चोरीच्या चार दुचाक्या हस्तगत करण्यात आले असून दोघांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, यातील मुख्य संशयित आरोपी फरार आहे.

गेल्या मागील काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरींच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या आहे. यासंदर्भात शहरातील पाचही पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या रेकार्डवरील अट्टल गुन्हेगार मुकुंदा देवीदास सुरवडे रा. मेहरूण ता.जि.जळगाव हा दुचाकींची चोरी करून तालुक्यातील चिंचोली गावातील गोपाल राजेंद्र पाटील आणि विशाल मधुकर इखे यांच्या मार्फत गावातील लोकांना विक्री केली असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पथक तालुक्यातील चिंचोली गावात जावून गोपाल पाटील आणि विशाल इखे या दोन्ही संशयित आरोपींना आज मंगळवारी सापळा रचून अटक केली. त्यांनी चिंचोली गावात विक्री केलेल्या चार दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस उपनिरीक्ष रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गफार तडवी, पोना. मिलींद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील यांनी केली. दोन्ही संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित आरोपी मुकुंदा सुरवाडे हा फरार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज