रक्षाबंधन ठरला घातवार : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । भरधाव वेगाने पारोळाकडून एरंडोलकडे जाणाऱ्या ट्रकने एरंडोलकडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय-२७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय-२२ वर्ष हे जळू येथील युवक जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोलकडून दुचाकी क्रमांक एमएच.२०.एफक्यू.७५०५ ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने जळू येथे घरी जात होते. शहा पेट्रोल पंपनजीक पारोळाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच.१९.झेड.४५२७ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले. दुर्घटना घडल्यानंतर ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भादवि कलम ३०४अ.२७९, मोटर वेहिकल अँक्ट १३४ व १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विलास पाटील, जुबेर खाटीक व विकास खैरनार हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -