fbpx

उमर्दे गावाजवळून ट्रक चोरीला ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ ।रंडोल – म्हसावद रस्त्यावरील उमर्दे गावाजवळ एम.एच.१८ ए. ए.७२३६ या क्रमांकाचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केला. ही घटना २ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजेपासून ते ३ मे रोजी सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली.

याप्रकरणी मोहम्मद अस्लम मोहम्मद यूसूफ अंसारी (रा.जामा मस्जिद , धुळे) यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला शुक्रवारी फिर्याद दिल्यावरून भाग ५ गु.र.न .७ ९ / २१ भा.दं.वि. कलम ३७ ९ प्रमाणे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस नाईक काशिनाथ पाटील, कॉन्सटेबल पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज