खड्डयांनी केला घोळ : जळगावात ट्रक उलटला, चारचाकीचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील खड्डयांमुळे होणारे अपघात अद्यापही थांबत नसून नेहमी कुणाचे तरी नुकसान होत आहे. दूध फेडरेशनकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खड्ड्यांमुळे ट्रक उलटला. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी चारचाकीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नगरसेवक आणि मनपा प्रशासन ढुंकूनही पाहत नसल्याचा आरोप करीत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला.

याबाबत असे की, शहरात विविध भागात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या अमृत योजनेच्या काम शिवाजीनगर परिसरात देखील या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. या रस्त्यावरून माल ट्रक (क्र.एमएच १९ झेड ५७६३) धान्य भरून जात होती. ट्रक चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ती ट्रक खड्ड्यामुळे उलटली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

ही अपघातग्रस्त ट्रक थेट एका कारवर जावून पडली. यात त्या कारच्या काचा फुटल्या आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. याबाबत स्थानिक नागरसेवकडे तक्रार केली असता ते  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज