ट्रक-मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार ; यावल-भुसावळ मार्गावरील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । यावल-भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

बोरावल येथून आज (ता.२२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दगडू रामदास शिंदे हे (वय ५०, रा.आव्हाणे ता. जि. जळगाव) हे बोरावलकडून भुसावळ येथे मोटारसायकल (क्र. एम.एच. १९ डीएच २१७४) ने भाची मनिषा ईश्वर सोनवणे (वय १८) हिस सोबत घेऊन जात होते. रस्‍त्‍यावर वाघळूद फाट्याजवळ भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या ट्रक (क्र. जीजे २७ टीटी ४३७८) या ट्रकने धडक दिली. यात धडकेत दगडू शिंदे हे फेकले गेले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर सोबत असलेली त्यांची भाची मनिषा सोनवणे ही गंभीर जखमी झाली आहे.

अंजाळे येथील राहणारे धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीला तत्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिचे यावल ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करण्यात येवून तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज