भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेनला ट्रक धडकला ; सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१ । पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत असणार्‍या अमळनेर ते धरणगाव स्थानकाच्या दरम्यान सुदैवाने एक मोठा रेल्वे अपघात टळला. रेल्वेच्या मार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खडी वाहून नेणारा ट्रक भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रेनला धडकला. या धडकेमुळे रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील भोणे गावाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम सुरू होते. येथे बांधकामासाठी लागणाऱ्या खडीने भरलेला डंपर ट्रॅकच्या बाजूला होता. कामगारांच्या बेफिकीरीमुळे अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस जळगाव कडे जात असताना खडीने भरलेला ट्रक घसरून रेल्वेवर जाऊन धडकला. सुदैवाने या अपघातात जीवित आणि वित्तहानी झाली नाही. मात्र काही वेळ गाडी थांबवण्यात आली. 

जेसीबीने डंपर खाली करून ट्रक मागे सरकवण्यात आला व काही वेळानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र ठेकेदार अथवा कामगारांच्या बेफिकीरीने मोठा अपघात होऊन अनर्थ घडू शकला असता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -