fbpx

उमाळा घाटात ट्रक चालकाला लुटले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । चिंचोली येथून रिकाम्या बाटल्यांचा ट्रक घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाला उमाळा घाटात चौघांनी लुटल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील रहिवासी असलेले सोनजी अशोक मिरगे हे ट्रक चालक आहेत शनिवारी रात्री चिंचोली रिकाम्या बाटल्यांचा ट्रक क्रमांक एमएच.४६.एफ.५३४५ ने औरंगाबादकडे निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास मिरगे हे उमाळा घाटातून कमी वेगाने ट्रक घेऊन जात असताना दुचाकीस्वार चौघांनी ट्रकपुढे दुचाकी आडवी लावली. दुचाकीवरील दोघे लागलीच ट्रकमध्ये घुसले आणि चालकाला चाकूचा धाक दाखवीत पैशांची मागणी करू लागले. एकाने सोनजी यांच्या खिशातील मोबाईल हिसकावला आणि त्यांनी जळगावच्या दिशेने पळ काढला. सोनजी यांनी लागलीच ट्रक मागे वळवून लूट करणाऱ्यांचा पाठलाग सुरू केला परंतु ते वेगाने निघून गेले.

रविवारी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी भेट दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज