fbpx

चालकास फिट आल्याने ट्रकचा अपघात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । चालकास फिट आल्याने ट्रॅकवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला उतरल्याचे घटना चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी तातडीने चालकास ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

चालकास फिट आल्याने ट्रकवरील ताबा सुटून ट्रक (क्रमांक – एम.एच.०३. सी.पी.९६४४) रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इलेक्ट्रिक पोलच्या शेजारी रस्त्याच्या खाली उतरल्याची घटना चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर दि.२५ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर हिरापूर रोडवर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी चालकास ट्रकमधून बाहेर काढले. ट्रकचालकास फिट आल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यनानंतर त्यांनी जागेवरच त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला शुद्धीवर आणले व तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज