fbpx

वरणगावजवळ आयशर ट्रकचा भीषण अपघात : चालक जागीच ठार

 जळगाव लाइव न्यूज I ७ ऑक्टोबर २०२१ I तालुक्यातील वरणगाव शहराजवळून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील कुशल ढाब्यासमोर चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला मागून येणार्‍या ट्रकने दिलेल्या धडकेत चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वरणगाव जवळील कुशल ढाब्या समोर एका ट्रकचे चाक फुटल्यामुळे भर रस्त्यातच उभा करण्यात आला होता  पाठीमागून येणारा आयशर मालवाहू ट्रक समोर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे ट्रकला जोरात धडक दिल्यामुळे भुसावळ कडे जाणार्‍या ट्रक मधील ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव हद्दीतील नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील कुशल ढाब्याच्या समोर टायर फुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. हा ट्रक उभा असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाठीमागून येणार्‍या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे पाठीमागून येणार्‍या ट्रक मधील ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात इतका विचित्र होता की अपघातग्रस्त झालेल्या ट्रक मधून ड्रायव्हरला बाहेर काढणे सुद्धा कठीण झाले होते स्थानिक नागरिकांच्या मदतीने ड्रायव्हरला बाहेर काढून शव विच्छेदनासाठी वरणगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज