fbpx

आर.आर.शाळेच्या चौकात वाळूने भरलेली ट्रॉली उलटली

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । शहरातील आर.आर.शाळेच्या चौकात खड्ड्यात चाक रुतल्याने वाळूने भरलेली ट्रॉली उलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, चालक ट्रॅक्टरचे हुड घेऊन गायब झाला असून वाहनधारकांना त्रास होत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून वाळू उपसा बंद असून तरीही अवैध वाळू वाहतूक सुसाट आहे. शहरातील आर.आर.शाळेजवळील चौकात ऑर्किड हॉस्पिटललगत रस्त्यावर खोदलेल्या चारीत चाक रुतल्याने वाळूने भरलेली ट्रॉली उलटली. रस्त्यावर वाळू पसरली असून ट्रॉलीचे चाक देखील निखळून पडले आहे.

वर्दळीचा परिसर असलेल्या या रस्त्यावर वाळू पसरली असल्याने नागरिकांना आणि विशेषतः वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन ट्रॅक्टरवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज