शालकाच्या मोबाईलवर तलाक, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | ७ सप्टेंबर २०२१ | भुसावळ येथे माहेर असणार्‍या तरूणीला तिच्या पतीने मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या बाबत तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की , शहरातील रहिवासी तरूणीचा हिंगोली येथील तरूणाशी विवाह झाला होता. काही दिवसांमध्येच तिचा छळ सुरू झाला. काही महिन्यांपासून आपल्याला व्यापार करायचा असल्याने माहेराहून एक लाख रूपये घेऊन ये अशी मागणी तिला करण्यात आली. पती आणि सासरच्या मंडळीने तिला त्रास देण्यास प्रारंभ केला.

काही दिवसांपूर्वी पतीने शालकाच्या मोबाईलवर फोन करून तीनदा तलाक बोलून तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेने हिंगोली पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली आहे. पती मोईन हबीब गवळी, सासरे हबीब गवळी, सासू नजमा हबीब गवळी, अख्तर हबीब गवळी, शन्नो अख्तर गवळी आणि नसीम या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -