fbpx

आमदार राजूमामा यांच्या अध्यक्षतेत वृक्षारोपण कार्यक्रम

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट  २०२१ ।  आदर्श नगर ,मंडळ ९ येथे शनिवारी जळगाव शहराचे आमदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष  सुरेश भोळे व  भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.  कार्यक्रमात स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक  राजेंद्र घुगे पाटील , भाजपा युवामोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे , भाजपा महानगर मंडळ ९ अध्यक्ष निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला

यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन युवामोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील यांनी केले असून याचे सूत्रसंचालन केले . तसेच स्थानिक लोकांसोबत वृक्षारोपण करत आमदार भोळे यांनी प्रबोधन केले व सामाजिक कार्य जास्तीत जास्त करून प्रभागातील अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व कार्यक्रमा विषयी मार्गदर्शन केले. तसेच महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनीही सर्व वरिष्ठ लोकांना व युवावर्गाला प्रेरित करत मार्गदर्शन केले ,

यावेळी शाम पाटील , युवामोर्चा चिटणीस जयंत चव्हाण , प्रभाग अधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज