fbpx

आ.भोळेंच्या वाढदिवसानिमित भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन महानगर आघाडीतर्फे वृक्षारोपण

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । जळगाव विधानसभेचे आमदार सुरेश दामू भोळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन महानगर आघाडी व नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगांव यांच्यातर्फे, नवीन बस स्थनकाजवळ, चिमुकले राम मंदिर रिक्षा स्टॉप येथे  वृक्षारोपण आयोजीत करण्यात आले.

सदर वृक्षारोपण प्रसंगी भाजपा महानगर आघाडी अध्यक्ष प्रमोद भाऊ वाणी, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, हॉकर्स आघाडी संघाचे अध्यक्ष प्रभाकर तायडे, सुनील वाणी, सुनील चौधरी, रमेश सोनार, मुरलीधर परदेशी,संजय सपकाळे, किशोर मोरे, गंभीर तडवी, पद्माकर पाटील, कुलदीप वाणी, दीपक साळी, आबा पाटील, प्रदीप बायास, प्रकाश बनसोडे, विलास दलाल, जाऊर सूर्यवंशी, प्रकाश चौधरी तसेच रिक्षा चालक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज