टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, दुचाकी पुलावरून कोसळली, १ ठार, १ जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरचे टायर फुटल्याने अपघातात भुसावळ येथील दीपनगरातील कर्तव्य बजावून घराकडे निघालेल्या सुरक्षा रक्षकाचा ३५ फूट पुलावरून पडल्याने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडला. कैलास पाटील (वय ४९, खडका, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.तर सहकारी राहुल दिलीप पाटील जखमी झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला. असून अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

सविस्तर असे की, खडका गावातील रहिवासी कैलास पाटील हे दीपनगरात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारची रात्र पाळी संपवून ते गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घराकडे येण्यासाठी दुचाकीवरून राहुल दिलीप पाटील (वय ३५) यांच्यासोबत निघाले मात्र, फेकरी उड्डाण पूलावरून भुसावळकडून वरणगावकडे जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचे चालकाकडील पुढचे टायर फुटले व समोरून येत असलेल्या कैलास पाटील यांच्या दुचाकी (एम.एच.19 ए.के.2683) वर धडकल्याने कैलास पाटील यांची दुचाकी उड्डाणपुलावर पडली मात्र पाटील हे थेट गाडीवरून पूलावरून खाली फेकले गेले. सुमारे 35 फुट उंचीच्या पूलावरून पाटील खाली पडल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत मोटर सायकलीवर मागे बसलेले राहुल दिलीप पाटील (35) हे पुलावरच पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत.मृत कैलास पाटील यांच्यावर गुरूवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, सून, जावाई असा परीवार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -