टँकरवर ट्रॅव्हल्स धडकली, पुणे जाणारे प्रवासी बचावले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव शहराकडून पुणे शहराकडे जात असलेली ट्रॅव्हल्स नगरदेवळाजवळ पुढे धावत असलेल्या टँकरवर धडकली. सुदैवाने अपघातात ट्रॅव्हल्समधील प्रवासी बचावले आहेत.

जळगाव शहराकडून पुणे शहराकडे बुधवारी रात्री ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच.१९.सीवाय.४४४३ जात होती. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास भडगाव ते नगरदेवळा दरम्यान पुढे चालत असलेल्या टँकर चालकाने ब्रेक मारताच ट्रॅव्हल्स त्याच्यावर धडकली. ट्रॅव्हल्सवर मागून येत असलेली चारचाकी देखील धडकली.

सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून घटनास्थळी गर्दी जमली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar