fbpx

जिल्ह्यातील २६ प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकतेच झाले आहे जिल्ह्यातील २६ विविध पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत.

कोणाची कुठे बदली? वाचा खालील प्रमाणे 

>शनिपेठचे प्रभारी असणारे निरिक्षक विठ्ठल ससे यांची पोलीस निरिक्षक सुरक्षा शाखा प्रभारी येथे बदली झाली आहे.

>भुसावळ शहरचे निरिक्षक बाळासाहेब बाजीराव ठोंबे यांची जिविशा शाखा जळगाव प्रभारी येथे बदली करण्यात आली आहे.

>भुसावळ तालुका पोलीस स्थानकातील रामकृष्ण महादू कुंभार यांची जळगाव तालुका स्थानकात प्रभारी निरिक्षकपदी बदली झाली आहे.

>रावेर पोलीस स्थानकाचे रामदास वाकोडे यांची जिल्हापेठ पोलीस स्थानकात निरिक्षकपदी बदली झाली आहे.

> चाळीसगावचे प्रभारी विजयकुमार नरसिंहराव ठाकूरवाड यांची जळगाव शहर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.

>जामनेरचे प्रताप विश्‍वनाथ इंगळे यांची भुसावळ शहर पोलीस स्थानकात निरिक्षकपदी ट्रान्सफर झाली आहे.

>शहर वाहतूक शाखेचे देविदास मधुकर कुनगर यांची चोपडा ग्रामीण येथे बदली झाली आहे.

> पोलीस नियंत्रण कक्षातील किरण बाजीराव शिंदे यांची जामनेर स्थानकात बदली झाली आहे.

>बुलढाणा येथील कैलास नागरे यांची रावेर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.

>बीडीडीएस नाशिक शहर येथील विजय फकीरराव शिंदे यांची रामानंदनगरला बदली झाली आहे.

> वाशीम येथील शंकर विठ्ठल शेळके यांची धरणगाव पोलीस स्थानकात बदली झाली आहे.

> नाशिक ग्रामीण येथील कांतीलाल काशिनाथ पाटील यांची चाळीसगाव शहरला बदली झाली आहे.

>धरणगाव येथील अंबादास शांताराम मोरे यांची जळगाव येथील मानव संसाधन शाखेत बदली झाली.

>जिल्हापेठचे विलास वसंत शेंडे यांच्याकडे आता भुसावळ तालुक्याचा प्रभार असणार आहे.

> सुरक्षा शाखेतील दिलीपसिंह मांगो पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली झाली.

>नियंत्रण कक्षातील लिलाधर नारायण कानडे यांच्याकडे आता जळगाव शहर वाहतूक शाखेची जबाबदारी आली आहे.

>सायबर पोलीस स्थानकाचे बळीराम हिरे यांची शनिपेठला बदली झालेली आहे.

> संतोष नारायण भंडारे यांच्याकडे आता पारोळा स्थानकाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.

>मानव संसाधन विभागातील अरूण काशिनाथ धडवडे यांच्याकडे पहूर स्थानकाची जबाबदारी आली आहे.

>भुसावळ बाजारपेठचे सपोनि अनिल छबू मोरे यांच्याकडे नशिराबादची जबाबदारी आली आहे.

>एलसीबीचे सपोनि सिध्देश्‍वर हेमंत आखेगावकर यांच्याकडे फैजपूर स्थानकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
>पिंपळगाव हरेश्‍वरच्या सपोनि निता कायटे यांच्याकडे कासोदा पोलीस स्थानकाची जबाबदारी आली आहे.

> बाजारपेठचे सपोनि कृष्णा भोये यांना पिंपळगाव हरेश्‍वरची जबाबदारी मिळाली आहे.

> एमआयडीसीतील सपोनि जयेश खलाणे यांना मारवड स्थानकाची जबाबदारी मिळाली आहे.

>पहूरचे सपोनि स्वप्नील नाईक यांच्याकडे भुसावळ शहर वाहतूक शाखेची जबाबदारी असेल.

> नाशिक येथून येणारे आशिषकुमार आडसूळ यांच्याकडे वरणगावची जबाबदारी मिळाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज