fbpx

जळगाव जिल्ह्यात ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे. सहा बदल्या या जिल्ह्यातंर्गत तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे

यांच्या झाल्या बदल्या?

शुक्रवारी पारित झालेल्या आदेशानुसार येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन. डी. महाजन यांची सार्वजनिक रुग्णालय जळगाव येथे तर वरखेडी (ता. पाचोरा) येथील डॉ. शांताराम ठाकूर यांची जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव येथे बदली झाली आहे. तर वरणगाव येथील डॉ. क्षितिजा हेंडवे यांची वावंजे (ता. पनवेल) येथे बदली झाली.

सहा बदल्या या जिल्ह्यातंर्गत तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे. बदली झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी लवकरात लवकर हजर व्हावे लागणार आहे. सध्याच्या ठिकाणची आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज