fbpx

डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांची बदली

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज | २ सप्टेंबर २०२१ | जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (समान्य प्रशासन) कमलाकर रणदिवे यांची बदली झाली असून याबाबतचे निर्देश ग्रामविकास खात्याने जारी केले आहेत.

 

गेल्या महिन्यात पंकज आशिया यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर अजून काही अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता होती. या अनुषंगाने आता सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांची बदली झाल्याचे निर्देश ग्रामविकास खात्याने जारी केले आहेत. त्यांची पुणे जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ म्हणून बदली झाली आहे.

 

दरम्यान, कमलाकर रणदिवे यांच्या जागी नेमके कोण येणार हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, याबाबत लवकरच नियुक्ती मिळणार असल्याचे संकेत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज