fbpx

जिल्हा पाेलिस दलातर्फे ७७० जणांच्या बदल्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । कोरोनाकाळामुळे पोलिस दलातील केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार सोमवारी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध केले. यात निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना मनाप्रमाणे बदली मिळाली आहे. तर अनेकांनी आहे तिथेच थांबवण्याची केलेली विनंती देखील मान्य करण्यात आली. मनाप्रमाणे बदली मिळाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी पोलिस मुख्यालयात पेढे वाटून आनंद साजरा केला.

गतवर्षी कोरोनामुळे १५ टक्के तर यंदा २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मान्यता दिली होती. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व हवालदारपदाच्या बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. तर पोलिस नाईक व शिपाई यांच्या अर्जांवर दिलेल्या ३ पर्याय पैकी त्यातील एक ठिकाणी नियुक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. निम्म्याहून जास्त कर्मचाऱ्यांना मनाप्रमाणे बदली मिळाली आहे. यातील अनेकांनी सध्या आहे त्याच ठिकाणी नियुक्ती मागीतली होती. तर इतरांना तीन पैकी एका ठिकाणी बदली मिळाली आहे. बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना मार्च २०२२ नंतर बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. इतरांना लागलीच कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी सोडावे असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिले आहे.

७७० जणांच्या बदल्या
जिल्हा पाेलिस दलातर्फे १०९ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, २०८ हवालदार, २०१ पोलिस नाईक व २५२ पोलिस शिपाई अशा ७७० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt